Job Fair : नगर : नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) पोर्टलच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर येथे दि. २४ जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पाच आस्थापनांकडून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून, नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी केले आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
इथे होणार मेळावा
केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) पोर्टलच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. २० ते २४ जुलै या कालावधीत ‘एनसीएस पोर्टल लाँच वीक’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, टी. व्ही. सेंटर, अहिल्यानगर येथे दि. २४ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
नक्की पहा : अन्यायकारक बदली तात्काळ रद्द करा; एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आंदोलन
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड (Job Fair)
या मेळाव्यात एच. एस. सोल्युशन प्रा. लि., साई इन्फोटेक, संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, जनराली सेंट्रल लाईफ इन्शुरन्स आणि मुथूट होम फायनान्स ही पाच आस्थापने सहभागी होणार आहेत. एचएससी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.



