Restraining Order : नगर : सण, उत्सव, विविध कार्यक्रम, मंत्री व इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच जातीय संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा (Ahilyanagar District) महसूल हद्दीत २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष दळवी (Subhash Dalvi) यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश (Restraining Order) पारित केला आहे.
नक्की वाचा : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर… अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
स्फोटके जवळ बाळगणे अथवा तयार करणे यावरही बंदी
या आदेशानुसार शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दगड, क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्यासाठी वापरावयाची साधने जवळ बाळगणे, तयार करणे अथवा जमा करणे, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे तसेच दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे अथवा तयार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई (Restraining Order)
याशिवाय जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक तसेच मानवी आवाजाचे वर्धन करणारी अथवा तो जसा आहे तसा ऐकविणारी उपकरणे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सभ्यता किंवा नीतिमत्तेला धक्का पोहोचेल अथवा सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, सोंग आणणे तसेच चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे अथवा त्यांचा प्रचार करणे यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी सभा घेणे, मिरवणुका काढणे, रस्ता रोको करणे तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.



