Crime News : श्रीरामपूर : कोपरगाव येथील एका २२ वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) सागर बेग, त्याचा भाऊ सोनू बेग आणि बाबू साळवे या तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत श्रीरामपूर शहरात (Shrirampur city) हा प्रकार घडला.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
पीडिता ही आजीकडे श्रीरामपूर येथे आली असताना तिची बाबू साळवे याच्याशी ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत साळवे याने तिला तब्बल ४० दिवस एका खोलीत डांबून ठेवत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या काळात सागर बेग व सोनू बेग यांनी बंदुकीचा धाक दाखवून पीडितेला साळवे याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपींविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Crime News)
बुधवारी (ता. २२) सकाळी पीडितेने शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर घटनास्थळ श्रीरामपूर शहर हद्दीत असल्याने गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार, बेकायदेशीर कैद, धमकी व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील आरोपी सोनू बेग हा पोक्सो प्रकरणातील आरोपी असून सध्या अन्य गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध नुकताच आर्म्स ॲक्टअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. बाबू साळवे याच्यावर खून, विनयभंग व आर्म्स ॲक्टसह विविध गुन्ह्यांची नोंद आहे. सागर बेग याच्याविरुद्धही यापूर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत असून आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे



