Anna Hajare Protest : वाडिया पार्क येथील मौन आंदोलनात अण्णा हजारे भावूक; दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Anna Hajare Protest : वाडिया पार्क येथील मौन आंदोलनात अण्णा हजारे भावूक; दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

0

Anna Hajare Protest : नगर : अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क जवळील महात्मा गांधी स्मारक येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ दोन तास मौनव्रत (मौन आंदोलन) केले. दरम्यान आंदोलनस्थळी पोहचताच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अण्णा हजारे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीतील जंतरमंतरवर विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमार, पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे काहीसे भावूक झाले होते. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनकर्त्यांचा आवाज दडपून न टाकता संवादातून मार्ग काढण्याचे आवाहन केले होते.

नक्की पहा : अन्यायकारक बदली तात्काळ रद्द करा; एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आंदोलन

‘अहिल्यानगरचे जंतरमंतर’ (Anna Hajare Protest)

अण्णांनी पंतप्रधांना लिहिलेल्या पत्रात निदर्शकांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या आणि पोलिस कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. अण्णा हजारेंच्या या धरणे आंदोलनादरम्यान या ठिकाणाला ‘अहिल्यानगरचे जंतरमंतर’ असेही संबोधण्यात आले होते.