Local Crime Branch : जिल्ह्यात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापा; 13 संशयित आरोपींकडून पाच लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : जिल्ह्यात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापा; 13 संशयित आरोपींकडून पाच लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर तालुक्यासह श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे (Shrirampur City Police Station) हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून 13 संशयित आरोपींकडून पाच लाख 68 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पापा जलाल पठाण (वय ६५, रा. आंबेडकर चौक, ता. जि. अहिल्यानगर), गोरक्ष बन्सी शेळके (वय ४४, रा. बोल्हेगांव, ता. जि. अहिल्यानगर), श्रीराम दशरथ कचरे (रा. गांधीनगर, बोल्हेगांव, ता. जि. अहिल्यानगर), अमोल नंदकुमार बारस्कर (वय ३१, रा. भिस्तबाग नाका, पाईपलाईन रोड, ता. जि. अहिल्यानगर), राहुल अशोक बर्डे (वय २९, रा. साईराज नगर, वडगांव गुप्ता रोड, नवनागापुर, ता. जि. अहिल्यानगर), आयुष भरत आहेर (वय २३, रा. वंजारगल्ली, मंगलगेट, ता. जि. अहिल्यानगर), सचिन पुर्ण नांव माहित नाही), केतन उर्फ कैलास शहा (रा. नाशिक), दत्तात्रय मोतीलाल देशमाने (वय ६६, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, ता. जि. अहिल्यानगर), या संशयीतान विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हिराबाई सुभाष गायकवाड रा. वडारवाडा, बेलापुर, ता. श्रीरामपुर), रेणुका सचिन गायकवाड रा. वडारवाडा, बेलापुर, ता. श्रीरामपुर), महेश बाळासाहेब गायकवाड रा. वडारवाडा, बेलापुर, ता. श्रीरामपुर), मंगल कचरु मांजरे रा. वडारवाडा, बेलापुर, ता. श्रीरामपुर), यांच्या विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडून पाच लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, प्रकाश मांडगे, प्रदिप शेळके तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमिझराजा आतार, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली आहे.