POCSO Act: मुलीचे नातेवाईक तक्रार घेऊन पोलिसात गेले; तपासात फिर्यादीचेच कारनामे उघड झाले!

0

POCSO Act अहिल्यानगर: अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण व छेडछाड करणे अशा प्रकारचे गुन्हे वाढत चालले आहे. अशातच जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. पोक्सो (Pocso Act) कायद्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांनी चौकशी सुरु केली असता वेगळीच माहीती समोर आली, त्यामुळे पोलिसांसह तेथे उपस्थित सर्वच आवाक झाले.

POCSO Act मॅसेज पाठवत एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली

जिल्ह्यात एका ठिकाणी राहत असलेली 17 वर्षाय मुलगी आणि 19 वर्षीय मुलगा यांची मैत्री होती. त्या दोघांच्या कुटुंबाला याबाबत कळाल्यावर दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला. त्यामुळे मुलाने त्या मुलीशी असलेली मैत्री तोडली. पण काही दिवसांनी मुलीने मुलाला सोशल मीडियावरुन मॅसेज पाठवत एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मुलाने नकार दिला आणि तो मॅसेज घरच्यांना दाखवला. तेव्हा दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद पेटला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने पोलिसात जाऊन तक्रार केली. आमच्या मुलीला सोशल मीडिया (Social Media) वापरता येत नाही. संबंधीत मुलानेच तिला सोशल मीडिया अकाउंट काढून दिले आणि त्यानेच हा मॅसेज टाकला आहे, अशी तक्रार मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिली.

POCSO Act मोबाईल उघडताच वेगळी माहीती मिळाली

त्यामुळे पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार मुलाचे कुटुंब पोलिस ठाण्यात हजर राहिले, मात्र मुलगा पसार झाला. पोलिस ठाण्यातही दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरुच होता. मग पोलिसांनी मुलीच्या मोबाईलपासूनच तपासाला सुरुवात केली. पण मुलीच्या आईने मोबाईल देण्यास नकार दिला. मोबाईलचा पासवर्ड नाही, मोबाईलमध्ये रिचार्ज नाही, सीमकार्ड नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे तिने दिली. मात्र पोलिसांनी दरडवताच मुलीच्या आईने मोबाईल दिला पण मोबाईलमध्ये सीमकार्डच नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी मुलीच्या घरी जाऊन सीमकार्ड शोधले. मुलीच्या वडिलांनी मोबाईलमध्ये रिचार्जही केला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल तपासायला सुरुवात केली. मुलीच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून मुलाला मॅसेज गेल्याचे दिसून आले. मात्र त्यासोबतच काही फोटो आणि व्हिडीओही पोलिसांना दिसली. ते फोटो आणि व्हिडीओ संबंधित मुलगी व मुलाऐवजी चक्क मुलीच्या आईच्या प्रेम प्रकरणांची होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याने पोलीसही काही वेळ चक्रावून गेले.