Social Media : नगर : सोशल मीडियाचा (Social Media) गैरवापर करून एका व्यावसायिकाची आणि एका महिलेची बदनामी (Defamation) केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. एका तरुणाने एआयचा (AI) वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसारित करून समाजात बदनामी केली. याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नक्की वाचा: पाथर्डी येथे अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न; आई-वडील, पती व नातेवाईकांवर गुन्हा दाखल
बनावट फोटो सार्वजनिक करून केली बदनामी
नेवासा तालुक्यातील एका मोबाईल दुकानदाराने या संदर्भात सोमवारी (ता.२७) फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, एका संशयित इन्स्टाग्राम खातेधारकाने फिर्यादीच्या पत्नीबद्दल अत्यंत अश्लील मजकूर स्टोरीमध्ये लिहिला होता. इतकेच नव्हे तर, फिर्यादी आणि गावातील एका महिलेचे छायाचित्र घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने (एआय) आक्षेपार्ह फोटो तयार करण्यात आले. हे बनावट फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक करून दोघांचीही बदनामी केली. हा प्रकार मार्च महिन्यापासून सुरू होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Social Media)
वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित व्यक्तीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा तांत्रिक शोध घेतला जात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



