
नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ (Farmer Loan Waiver)अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी (First list of eligible farmers) काल (ता.२२) बुधवारी जाहीर झाली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. या यादीत ५३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाकडून अजून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झालेली नाही. आता उर्वरीत शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी (AgriStack Registration) करणे आवश्यक आहे. तरच त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
नक्की वाचा : रक्षकच बनला भक्षक! शेवगाव घोटाळ्यात लाच मागणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित!
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत ५३३ पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. सरकारने २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपये कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सध्या या यादीत ठाण्यातील सर्वाधिक १८२, लातूरमधील १३३, पुणे ८५, अमरावती ५८, सातारा ३८, सोलापूर २१, नागपूरमधील १६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र टप्प्याटप्प्याने इतर शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआय करणार कारवाई
आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक (Farmer Loan Waiver)
लवकरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. या याद्या ऑनलाईन पाहता येतील. ग्रामपंचायत तथा बँकेच्या सूचना फलकावर त्या लावण्यात येतील. यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्र अथवा इतर सुविधा केंद्रावर जात आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आता यामध्ये शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. या दोन्ही प्रक्रियेनंतर खात्यावर पैसे जमा होऊन जुनी थकबाकी वळत करण्यात येईल. सहकार खात्याने निधी वितरीत करण्याविषयी शासन निर्णय जाहीर केला आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी कशी कराल? (Farmer Loan Waiver)
ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आधार कार्ड, आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ७/१२ उतारा, बँक खात्याची माहिती आणि पीक कर्ज याचा तपशील द्यावा लागतो. त्यानंतर Farmer Registry या पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकायचा. मोबाईलवरील ओटीपी टाकून पडताळणी करायची ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शेतकऱ्यांना स्वतःची व शेताची माहिती द्यावी लागते. एकदा दिलेली माहिती योग्य आहे की नाही याची खातरजमा झाल्यानंतर अर्ज सबमिट करता येतो. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती घरबसल्या करता येते. अडचण असल्यास जवळील सेवा केंद्राची मदत तुम्ही घेऊ शकता.


