Local Crime Branch : नगर : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे मोठी कारवाई केली. घरासमोरील शेतात गांजाची (Marijuana) लागवड केल्याप्रकरणी ७५ वर्षीय शेतकऱ्याला अटक (Arrested) करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे सात लाख ४३ हजार ८०० रुपये किमतीचा ३७ किलो १९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
नक्की वाचा : येळी शिवारात चोरांचा धुमाकूळ; २५ शेतकऱ्यांच्या केबल लंपास
शेताची पंचांसमक्ष पाहणी
दिलीप गंगाधर लाटे (वय ७५, रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. “नशा मुक्त भारत” अभियानांतर्गत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कोथुळ येथे छापा टाकला. यावेळी दिलीप गंगाधर लाटे (वय ७५, रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा) यांच्या घरासमोरील शेताची पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली. कडवळाच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, ही झाडे स्वतःच्या नशेसाठी लावल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
३७ किलो १९० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त (Local Crime Branch)
कारवाईदरम्यान पोलिसांनी ३७ किलो १९० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख ४३ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, सुनिल मालणकर, अमोल आजबे यांच्या पथकाने केली.



