
Pathardi Police : पाथर्डी : अवैधरीत्या विदेशी दारूची (Illegal foreign liquor) वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अटक (Arrested) केली. या कारवाईत ११ हजार ५२० रुपयांचा विदेशी दारूसाठा आणि ६० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ७१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नक्की वाचा : निष्पापांचे बळी जाऊनही आंदोलकांवरच गुन्हे; प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
वृद्धेश्वर कारखाना फाट्याजवळ केली कारवाई
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (ता. २४) सायंकाळी सुमारे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील वृद्धेश्वर कारखाना फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक आनंद कोकारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. के. दहिफळे, विनोद मासळकर, अमोल जवरे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी अमजद आयुब शेख (वय ४३, रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर) हा मोटारसायकलवरून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१४४ सिलबंद बाटल्या जप्त (Pathardi Police)
झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून १८० मिली क्षमतेच्या १४४ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत विदेशी दारूची किंमत ११ हजार ५२० रुपये व मोटारसायकल किंमत ६० हजार रुपये असा एकूण ७१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. के. दहिफळे करीत आहेत.


