Shrigonda News : निष्पापांचे बळी जाऊनही आंदोलकांवरच गुन्हे; प्रशासनाच्या भूमिकेवर संताप

तांत्रिक कारण सांगून रुग्णवाहिका देण्यास नकार

0
Shrigonda News : निष्पापांचे बळी जाऊनही आंदोलकांवरच गुन्हे; प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
Shrigonda News : निष्पापांचे बळी जाऊनही आंदोलकांवरच गुन्हे; प्रशासनाच्या भूमिकेवर संताप

Shrigonda News : श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre) आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका (Ambulance) न मिळाल्यामुळे दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या प्रकरणाला अत्यंत वादग्रस्त वळण मिळाले आहे. निष्पाप बालकांचा जीव गेल्याने जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे अपेक्षित असताना, उलट न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Srigonda Police Station) गुन्हा दाखल केला. प्रशासनाच्या या एकतर्फी भूमिकेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, “प्रशासन नक्की दोषींना पाठीशी घालत आहे की सामान्यांचा आवाज दाबत आहे?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नक्की वाचा : जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध; पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे

तांत्रिक कारण सांगून रुग्णवाहिका देण्यास नकार

लोणी व्यंकनाथ येथे दोन लहान मुली पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी नातेवाइकांनी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, ‘खासगी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका देता येत नाही,’ असे तांत्रिक कारण सांगून रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. वेळेत वैद्यकीय मदत आणि वाहतूक न मिळाल्याने अखेर त्या दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आंदोलन (Shrigonda News)

या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, स्मितल वाबळे यांच्यासह ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आंदोलन केले होते. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घटनेच्यावेळी मुख्य अधिकारी अहिल्यानगर येथे बैठकीसाठी गेले असता आरोग्य केंद्राला बाहेरून कुलूप लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, तसेच महिला कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घालून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात येऊन फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख करत आहेत.