Dharna Movement : जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध; पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे

मूलभूत अधिकारांचा गळा घोटला जात असल्याचा आरोप

0
Dharna Movement : जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध; पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे
Dharna Movement : जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध; पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे

Dharna Movement : पारनेर : दिल्लीत न्याय हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या (Baton charge) निषेधार्थ आज (ता. २४) पारनेर तहसील कार्यालयासमोर (Parner Tehsil Office) जोरदार धरणे व निषेध आंदोलन (Dharna Movement) करण्यात आले. पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील विविध पक्ष व संघटनांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. याप्रकरणी राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठवण्यासाठी नायब तहसीलदारांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.

नक्की वाचा : कोथुळमध्ये गांजाची शेती; ७५ वर्षीय शेतकऱ्याला अटक

मूलभूत अधिकारांचा गळा घोटला जात असल्याचा आरोप

निवेदनात नमूद केल्यानुसार, भारत हा लोकशाहीप्रधान आणि संविधानावर चालणारा देश आहे. संविधानाने नागरिकांना सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलण्याचा आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. मात्र, सध्या देशात या मूलभूत अधिकारांचा गळा घोटला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.शैक्षणिक क्षेत्रातील गैरप्रकार रोखणे, शिक्षण प्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणणे तसेच ‘नीट’ (NEET) आणि ‘यूजीसी’ (UGC) परीक्षांच्या पेपर फुटीविरोधात देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक, विद्यार्थी नेते अभिजित दिपके, नेहा व्होरा यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र जनआंदोलन सुरू केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा (Dharna Movement)

विद्यार्थ्यांचे हे वाढते जनआंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारने २० जुलै रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे उडवले आणि विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. या अमानुष कृत्याचा पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील सर्व पक्ष व संघटनांनी तीव्र शब्द निषेध केला आहे. पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे व प्रदर्शन करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला आहे.

पुरोगामी चळवळीतील विविध संघटना आणि कार्यकर्ते उपस्थित

यावेळी राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे, विलास साठे, ॲड बी एम सोनवणे, अनिल सोबले, किरण सोनवणे, संतोष खोडदे, संतोष वाबळे, अतुल भालेराव, प्रणव भालेराव, दादाभाऊ पटेकर, प्रल्हाद शिंदे, महेंद्र बोर्डे, हिरामण सोनवणे, बाळासाहेब शेटे, सम्राट साळवे, अजय साळवे, प्रदीप कसबे, सागर करंदीकर, अक्षय जाधव, अमोल ठुबे,साळवे सीताराम, सचिन गव्हाणे, अरुण शिंदे, सातपुते अंकिता, अडसूळ संतोष, अनिल सातपुते, माही सूर्यवंशी, साळवे यश आदींसह पुरोगामी चळवळीतील विविध संघटना आणि कार्यकर्ते उपस्थित होते.