Beating : मेंढ्याचा कळप शेतात उतरल्याचा राग धरत मेंढपाळास मारहाण; कर्जत तालुक्यातील घटना

काठी, दगडाने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण

0
Beating : मेंढ्याचा कळप शेतात उतरल्याचा राग धरत मेंढपाळास मारहाण; कर्जत तालुक्यातील घटना
Beating : मेंढ्याचा कळप शेतात उतरल्याचा राग धरत मेंढपाळास मारहाण; कर्जत तालुक्यातील घटना

Beating : कर्जत : रस्त्यावर टँकर उभा असल्याने मेंढ्याचा कळप (Flock of sheep) रस्त्यावरून खाली जात लगतच्या शेतात घुसल्याने त्याचा राग संबंधित शेतकऱ्यास आला. त्याने मेंढपाळ यास काठी, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जतचे पोलीस निरीक्षक हनमंत गायकवाड करीत आहेत.

नक्की वाचा : महापालिकेची सभा वादळी; घरपट्टीच्या मुद्यावरून आयुक्तांवर भिरकावली फाईल

काठी, दगडाने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण

गुरुवारी (ता.२३) कोरेगाव फाटा-सटवाईवाडी (ता.कर्जत) शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास  रामदास मल्हारी टेगले (मुढाळे, ता.बारामती) हा मेंढपाळ आपल्या मेंढ्याच्या कळपासह बीडवरून बारामतीच्या दिशेने निघाला होता. यावेळी सटवाईवाडी फाटा या रस्त्यावर एक टँकर उभा असल्याने मेंढ्याचा कळप रस्त्याच्या खाली उतरत शेताच्या दिशेने उतरला. मेंढ्या रोडच्या खाली का घेतल्या याचा राग धरत अमोल खराडे, राजेंद्र खराडे, गणेश राजेंद्र खराडे यासह चार महिला आणि त्यांच्या सोबत इतर काही जण यांनी मेंढपाळ रामदास टेगले आणि एक साक्षीदार यास संगनमत करून काठी, दगडाने तसेच लाथाबुक्क्याने मारीत दुखापत केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फिर्याद दाखल (Beating)

तसेच अमोल खराडे याने हातातील घड्याळ व चांदीची अंगठी काढून घेतली असल्याची फिर्याद रामदास मल्हारी टेगले यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे यांनी भेट दिली. सदर घटनेचा पुढील अधिक तपास कर्जतचे पोलीस निरीक्षक हनमंत गायकवाड हे करीत आहेत.