
Various District-Level Competitions : नगर : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat), अहिल्यानगर आणि सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा शक्ती-नशामुक्त भारताची शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन दि. २९ जुलै २०२६ रोजी सीएसआरडी, अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे.
नक्की वाचा : महापालिकेची सभा वादळी; घरपट्टीच्या मुद्यावरून आयुक्तांवर भिरकावली फाईल
सांघिक स्वरूपात सहभाग
युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करणे, या उद्देशाने जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक स्वरूपात सहभागी होता येणार आहे. स्पर्धांमध्ये लोकगीत (गायन), नृत्य, नुक्कड नाटक, माईम, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच कविता (स्लॅम पोएट्रीसह) या विविध कला व साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, सर्व स्पर्धांचा विषय ‘नशामुक्त भारत’ हा आहे. युवकांनी आपल्या कलाकृतीतून व्यसनमुक्तीचा प्रभावी व सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ऑनलाईन अर्ज
स्पर्धेतील विजेत्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुक स्पर्धकांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी करून इच्छित स्पर्धेची निवड करावी आणि मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी ९४२३४७०४३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.


