Tender Published : शेतकरी त्रैमासिकाच्या संपादन, मांडणी, छपाईसाठी संस्था निवडीची निविदा प्रसिद्ध

0
शेतकरी त्रैमासिकाच्या संपादन, मांडणी, छपाईसाठी संस्था निवडीची निविदा प्रसिद्ध
शेतकरी त्रैमासिकाच्या संपादन, मांडणी, छपाईसाठी संस्था निवडीची निविदा प्रसिद्ध

Tender Published : नगर : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, यशोगाथा, पीक व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेची माहिती तसेच कृषी विषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘शेतकरी’ त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात येते. या त्रैमासिकाच्या लेखांचे संपादन-सुलभीकरण, शुद्धलेखन, मांडणी-सजावट तसेच चौरंगी छपाई व राज्यभर वितरण करण्यासाठी सन २०२६-२८ या कालावधीकरिता सक्षम संस्थेची निवड करण्यासाठी जीईएम पोर्टलवर दि. २० जुलै २०२६ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नक्की वाचा : महापालिकेची सभा वादळी; घरपट्टीच्या मुद्यावरून आयुक्तांवर भिरकावली फाईल

जीईएम पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

इच्छुक व पात्र संस्थांनी विहित मुदतीत जीईएम पोर्टलवरून निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्रैमासिकाची गुणवत्ता अधिक प्रभावी व दर्जेदार राखण्यासाठी लेखांचे संपादन-सुलभीकरण, शुद्धलेखन, मांडणी-सजावट तसेच चौरंगी छपाई व राज्यभर वितरणाचे काम सन २०२६-२८ या कालावधीसाठी सक्षम व अनुभवी संस्थेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यासाठी जीईएम पोर्टलवर जीईएम/२०२६/बी/७८०९८५८ क्रमांकाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या नखालाही धक्का लागला तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही : नगरसेवक कुमार वाकळे

अंतिम मुदत

निविदा प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, निविदा दि. २० जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदापूर्व सभा दि. २४ जुलै २०२६ रोजी १२.०० वाजता होणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३ ऑगस्ट २०२६ असून, त्याच दिवशी तांत्रिक निविदा उघडण्यात येणार आहे. आर्थिक निविदा दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी उघडण्यात येणार आहे.