Devotional song released : ‘पांडुरंगा तूच माझा… दुजा कुणी नाही’ भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला; प्रियंका बर्वे यांच्या भावपूर्ण स्वरांनी विठ्ठलभक्तांना घातली भुरळ

Devotional song released : 'पांडुरंगा तूच माझा… दुजा कुणी नाही' भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला; प्रियंका बर्वे यांच्या भावपूर्ण स्वरांनी विठ्ठलभक्तांना घातली भुरळ

0

Devotional song released : नगर : पवित्र आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आणि वारीच्या भक्तीमय वातावरणात विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ‘पांडुरंगा तूच माझा… दुजा कुणी नाही’ हे सुरेल आणि भावुक भक्तिगीत प्रदर्शित झाले आहे. विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली ही संगीतमय कलाकृती ‘Sohamm Music’ प्रस्तुत ‘कडक भक्ती’ या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

नक्की वाचा : २० वर्षांची पायपीट अन् विठुरायाच्या महापूजेचा मान; मानाचे वारकरी दाम्पत्य नेमकं कोण?

यांचा स्वर…

या भक्तिगीताला सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांचा मधुर आणि आर्त स्वर लाभला असून, डॉ. संगीता बर्वे यांनी रचलेल्या शब्दांना डॉ. नीरज करंदीकर यांनी अत्यंत सुरेल संगीताची जोड दिली आहे. गाण्याच्या सुरुवातीला असणारा कौटुंबिक संवाद, पावसा-पाण्याची काळजी आणि त्याहूनही मोठी असणारी आजीची विठ्ठलावरची अढळ निष्ठा वारकऱ्यांच्या भावनांचे तंतोतंत दर्शन घडवते. “जीवनाचा करार करुनी आले तुझ्या पायी…” या ओळी भक्ताच्या मनातील विठुरायाप्रती असणारे समर्पण अधोरेखित करतात.

नक्की पहा : विद्यार्थ्यांच्या नखालाही धक्का लागला तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही : नगरसेवक कुमार वाकळे

घरबसल्या भक्तीचा अनुभव (Devotional song released)

आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीवर विठुरायाचे स्मरण करण्यासाठी आणि घरबसल्या वारीच्या भक्तीचा अनुभव घेण्यासाठी हे गाणे युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर ऐकले व पाहिले जात आहे. विठ्ठलभक्तांनी या भक्तीमय गीतात सहभागी होण्यासाठी गाणे नक्की पाहावे, ‘Kadak Bhakti’ चॅनेलला Subscribe करावे तसेच Like आणि Share करून हे गाणे प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन सोहम म्युझिकतर्फे करण्यात आले आहे.