Sharad Pawar on Dharmendra Pradhan : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं,धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

0
Sharad Pawar on Dharmendra Pradhan : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं,धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Sharad Pawar on Dharmendra Pradhan : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं,धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

नगर : गेल्या ३५  दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला (Central Government) झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. या ऐतिहासिक घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देशातील युवाशक्तीचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

नक्की वाचा : २० वर्षांची पायपीट अन् विठुरायाच्या महापूजेचा मान; मानाचे वारकरी दाम्पत्य नेमकं कोण?

शरद पवार नेमकं काय म्हणाले? (Sharad Pawar on Dharmendra Pradhan)

जंतर-मंतरवरील आंदोलक आणि विरोधी पक्षांनी एकमुखाने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. संपूर्ण देशात या आंदोलनाचे पडसाद पसरल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग १८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.”

‘हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक’ (Sharad Pawar on Dharmendra Pradhan)

“आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.