Pathardi Police Station : पाथर्डी : तालुक्यातील रांजणी येथील विद्युत डीपीवर (Electrical transformer) काम करताना शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या प्रकरणात महावितरणच्या उपअभियंता व वायरमनविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा (Pathardi Police Station) दाखल करण्यात आला आहे. कामावर नसतानाही तरुणाला अनधिकृतपणे डीपी तपासण्यासाठी बोलावून, विद्युत पुरवठा (Power supply) सुरू असल्याची माहिती असूनही पोलवर चढविल्याने ही गंभीर दुर्घटना घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मेंढ्याचा कळप शेतात उतरल्याचा राग धरत मेंढपाळास मारहाण; कर्जत तालुक्यातील घटना
डीपी तपासण्यासाठी बोलावल्याचा आरोप
याप्रकरणी बाबासाहेब विठोबा शिरसाठ (रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा ऋषीकेश बाबासाहेब शिरसाठ (वय २८) हा २०१८ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महावितरणमध्ये रोजंदारीवर वायरमन म्हणून कार्यरत होता. नंतर त्याला कामावरून कमी करण्यात आले असले तरी, गरज भासल्यास मदतीसाठी बोलावले जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने तो अधूनमधून कामात मदत करत होता. १२ जून २०२६ रोजी दुपारी महावितरणचे उपअभियंता मयूर जाधव व वायरमन पिराजी पालवे यांनी ऋषीकेशला रांजणी येथील डीपी तपासण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे. पालवे यांनी सबस्टेशनकडून विद्युत पुरवठा बंद केल्याचे परमिट घेतल्याचे सांगून त्याला डीपीच्या पोलवर चढविले. मात्र, प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरू असल्याने ऋषीकेशला जोरदार विजेचा धक्का बसला व तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ऋषीकेश गंभीर जखमी झाल्याचा आरोप (Pathardi Police Station)
सुरुवातीला त्याच्यावर पाथर्डी व अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे दोन्ही हात तसेच उजव्या पायाची तीन बोटे कापावी लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर पुढील उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी उपअभियंता मयूर जाधव व वायरमन पिराजी पालवे यांनी निष्काळजीपणा व हयगयी केल्याने ऋषीकेश गंभीर जखमी झाल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.



