CJP Protest: नगर: गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी आणि विविध राज्यांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटींची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्यात येणार आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने आपापल्या घरी परत जावे (CJP Protest)
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “आमच्या तीनही प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आमचे आंदोलन यशस्वी झाले असून आता सर्व आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी शांततेने आपापल्या घरी परत जावे.”
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तीनही मागण्या मान्य (CJP Protest)
जंतरमंतर येथे गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान अनेत नेत्यांनी, विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यासह नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचाही निर्णय झाला आहे.
हेही वाचा: मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
विद्यार्थ्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले (CJP Protest)
आंदोलन संपुष्टात आल्याची घोषणा झाल्यानंतर जंतरमंतर परिसरात उपस्थित विद्यार्थ्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. अनेक विद्यार्थ्यांनी हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले.



