
Young farmer dies of electric shock : पाथर्डी : तालुक्यातील डमाळवाडी येथे शेतातील बांधावर टाकलेल्या जिवंत वीजतारेचा स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरने पेरणी करत असलेल्या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू (Young farmer dies of electric shock) झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
ज्ञानदेव रावसाहेब डमाळे (वय ३८, रा. डमाळवाडी, ता. पाथर्डी) हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीचे काम करत होते. त्यावेळी शेजारील शेताच्या बांधावर टाकलेल्या जिवंत वीजवाहक केबलचा ट्रॅक्टरला स्पर्श होऊन त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. गंभीर जखमी झालेल्या ज्ञानदेव डमाळे यांना तातडीने अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी मृताचे भाऊ बाबासाहेब रावसाहेब डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र बाबासाहेब डमाळे, श्यामसुंदर बाबासाहेब डमाळे, चैतन्य रामचंद्र डमाळे (सर्व रा. डमाळवाडी, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निष्काळजीपणाचा आरोप (Young farmer dies of electric shock)
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधितांनी शेताच्या बांधावर जिवंत वीजवाहक केबल टाकून ठेवली होती. या केबलमुळे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असूनही त्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच निष्काळजीपणामुळे ज्ञानदेव डमाळे यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


