Suicide | नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील घटना

0

Suicide | कर्जत : देशाची तरुणाई एकत्र येत आंदोलनाचे फलित हाती येत नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. मात्र त्याच नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने जलालपूर (ता.कर्जत) येथील विद्यार्थिनी अंकिता सुरेश सांगळे हिने नैराश्यातून आत्महत्या (Suicide) करीत आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विद्यार्थिनीने जीवन संपवले (Suicide)

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील विद्यार्थिनी अंकिता सुरेश सांगळे हिने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. तिला नीट परीक्षेत १६६ गुण मिळाले होते. तेंव्हापासून ती नैराश्यातच होती. शनिवारी (ता. २५) तिने घरात कोणीच नसताना गळफास लावत स्वताचे जीवन संपवले. 

हे वाचा – वाडिया पार्क येथील मौन आंदोलनात अण्णा हजारे भावूक; दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

जलालपूर परिसरात शोककळा (Suicide)

दिल्लीतील जंतर-मंतर येथे याच नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या निषेधार्थ देशातील तरुणाई एकटवली. आंदोलनाची धार तीव्र ठेवत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यास शनिवारी दुपारी यश येत प्रधान यांनी नीट परीक्षेची पेपर फुटीची जबाबदारी घेत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्याकॅफे राजीनामा सुपूर्द केला. आणि त्याच दिवशी अंकीताने गळफास घेत आपले जीवन संपवले या घटनेने कर्जत तालुक्यासह जलालपूर परिसरात शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here