Two-wheeler thieves nabbed : नगर : स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक (Two-wheeler thieves nabbed) केली असून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या पाच चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस (Two-wheeler theft cases solved) आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
एकविरा चौक, पाइपलाइन रोड येथील साईकृपा बिल्डिंग परिसरातून शशिकांत भाऊसाहेब गलबले (रा. देऊळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा) यांची १७ जुलै रोजी सकाळी ११.३० या वाजण्याच्या दरम्यान शशिकांत भाऊसाहेब गलबले (रा. देऊळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा) यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सापळा रचून आरोपी ताब्यात (Two-wheeler thieves nabbed)
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी किशोर जयसिंग पठारे (वय ४५, रा. पिंपळगाव माळवी, ता. जि. अहिल्यानगर) याच्याबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार रविवारी (ता. २६) रामवाडी ते तारकपूर बसस्थानक मार्गावर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. त्यानंतर सखोल तपासात आरोपीकडून एकूण पाच चोरीच्या दुचाक्या असा एकुण १ लाख ५५ हजार रुपयांचा हस्तगत करण्यात आल्या.
संशयित आरोपीने अहिल्यानगरमधील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव आणि शिरूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याबात पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड़ यांच्या पथकाने केली आहे.



