
Local Crime Branch : नगर : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा (Illegal Sand Extraction) आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पारनेर तालुक्यात मोठी कारवाई (Major Action) करत ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत एका चालकाला ताब्यात घेण्यात आले असून वाहनमालक पसार झाला आहे. वाहनचालक दत्तात्रय नाना मेंगाळ (वय २५, मूळ रा. डिग्रस, ता. संगमनेर, सध्या रा. खडकवाडी, ता. पारनेर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संबंधित आयशर वाहन हे दीपक पोपट साळवे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. साळवे हा सध्या पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. रविवारी (ता.२६) रोजी रात्री पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना खडकवाडी परिसरातून वाहनाद्वारे अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कामटवाडी शिवारातील रचण्यात आला सापळा(Local Crime Branch)
माहितीच्या आधारे कामटवाडी शिवारातील हांडेवाडा फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. काही वेळात संशयित वाहन तेथे येताच पोलिसांनी ते अडवून तपासणी केली. वाहनामध्ये कोणतीही वैध परवानगी नसताना शासनाच्या मालकीची दोन ब्रास वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
वाहनचालक दत्तात्रय नाना मेंगाळ (वय २५, मूळ रा. डिग्रस, ता. संगमनेर, सध्या रा. खडकवाडी, ता. पारनेर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संबंधित आयशर वाहन हे दीपक पोपट साळवे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. साळवे हा सध्या पसार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत सुमारे २० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू आणि ८ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश कर्डिले यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, राहुल डोके, योगेश कर्डिले यांच्या पथकाने केली आहे.


