
Additional District and Sessions Court at Karjat : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्याकरिता कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (Additional District and Sessions Court at Karjat) सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावास 28 जुलै, 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीपरिषदेच्या (कॅबिनेट) बैठकीत (Cabinet Meeting) मान्यता देण्यात आली आहे.
सभापती महोदयांची भेट घेऊन केली हाेती विनंती
शनिवार, दिनांक 25 जुलै, 2026 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी कर्जत तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. कैलास शंकरराव शेवाळे, उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रय चव्हाण, सचिव ॲड. अविनाश मते, ॲड. सचिन रेणुकर, ॲड. संदिप पाटील यांच्या शिष्टमंडळाने सभापती महोदयांची भेट घेऊन या संदर्भात विनंती केली होती. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांनी, मुख्यमंत्री महोदयांना या मागणीबाबत अवगत केले जाईल आणि पाठपुरावा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार रोहित पवारांचाही पाठपुरावा (Additional District and Sessions Court at Karjat)
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. स्थानिक वकील संघटनांनी त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यांनीही सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कर्जत व जामखेड या तालुक्यांसाठी कर्जत जि. अहिल्यानगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी आवश्यक असणारे न्यायिक अधिकाऱ्यांचे 01 पद, सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची (शासकीय अभियोक्ता कार्यालयासह) एकूण 22 पदे, तसेच 07 मनुष्यबळ यांच्या सेवा या नव्या व्यवस्थेत असतील.


