
Action taken by the City Traffic Branch : नगर : शहरातील कायनेटिक चौक परिसरात शहर वाहतूक शाखेने (Action taken by the City Traffic Branch) वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of traffic rules) करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेत ब्लॅक फिल्म लावलेली वाहने, फॅन्सी नंबर प्लेट (Fancy number plate) वापरणारी वाहने तसेच विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रामराव शिरसाट व शामवेल गायकवाड यांच्यासह पोलीस अंमलदार सतीश दळवी, छगन दहिफळे, प्रवीण खंडागळे, राहुल काळे, अजय जपकर, बापू उंडे, सुरज शिंदे, तसेच वॉर्डन सतीश बालसिंग आणि सखाराम झोंड यांनी सहभाग घेतला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अशीच कारवाई सुरू राहणार (Action taken by the City Traffic Branch)
वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म किंवा फॅन्सी नंबर प्लेटचा वापर टाळावा, तसेच वाहनांवर अधिकृत नंबर प्लेट लावावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


