State-level Skating Marathon : बारामती येथील राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम; पटकावली ६ फुटांची मानाची ट्रॉफी

State-level Skating Marathon : बारामती येथील राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम; पटकावली ६ फुटांची मानाची ट्रॉफी

0

State-level Skating Marathon : बारामती (Baramati) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉन (State-level Skating Marathon) स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम पारितोषिक (First Prize) पटकावून संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य (गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ) पदकांची लुटालूट करत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्ह्याला ६ फुटांची भव्य आणि मानाची विजेतेपद ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

स्केटिंग मॅरेथॉन क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतून खेळाडूंनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सर्व जिल्ह्यांच्या तगड्या आव्हानावर मात करत अहिल्यानगरने प्रथम क्रमांक मिळवला आणि स्केटिंग मॅरेथॉन क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले. या मोठ्या यशामुळे सहभागी मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक (State-level Skating Marathon)

या यशामागे अहिल्यानगर स्केटिंग मॅरेथॉनचे अध्यक्ष गोरख धात्रक सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच केदार सर, आदित्य पालवे आणि सर्व पालक वर्गाने घेतलेले अपार कष्ट या यशाचे मुख्य शिल्पकार ठरले.

अहिल्यानगर मॅरेथॉन स्केटिंग क्लबच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्व पंचक्रोशीतून आणि क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. या विजयी घोडदौडीबद्दल महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष आशिष दहिफळे सर यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.