Farmer Loan Waiver: अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा (Rajmata Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver) लाभ मिळवण्यासाठी पात्र कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि वारंवार सर्व्हर बंद पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी (Farmer eKYC) अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत असून पात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अनेक अर्जांमध्ये Farmer ID उपलब्ध नाही (Farmer Loan Waiver)
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रांवर सकाळपासूनच शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. दिवसभर पोर्टलवर ताण वाढल्याने सर्व्हर प्रतिसाद देत नसल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहत आहेत. ही समस्या टाळण्यासाठी काही सेतू केंद्र चालक रात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेच्या वेळेतही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्या वेळीही अनेक अर्जांमध्ये ‘Farmer ID उपलब्ध नाही’ असा संदेश दिसत असल्याने काम पूर्ण होत नसल्याची तक्रार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध असूनही पोर्टल तो स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. तर काही प्रकरणांमध्ये कर्जदार आणि वारसदार यांच्या माहितीत तफावत, तसेच आवश्यक कागदपत्रांमधील विसंगतीमुळे ई-केवायसी प्रक्रिया रखडत असल्याचे दिसून येत आहे.
नक्की वाचा: खरीप पीक स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
संबंधित बाबी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या (Farmer Loan Waiver)
दिवसभर सर्व्हर प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. रात्री आणि पहाटे प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी फार्मर आयडीशी संबंधित तांत्रिक त्रुटींमुळे अनेक अर्ज पूर्ण होत नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील माहितीच्या आधारे सेवा संस्थांमार्फत शेतकऱ्यांचा तपशील संकलित करण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक कर्जदार आणि वारसदारांच्या नोंदींमध्ये तफावत असल्यामुळे प्रक्रिया अडत असून संबंधित बाबी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असून आवश्यक दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा : अहिल्यानगरात प्लास्टिकविरोधी कारवाईला वेग; महिनाभरात 365 किलो प्लास्टिक जप्त
दरम्यान, पाथर्डी-शेवगाव उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती घेऊन ती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



