
Farmer Loan Waiver eKYC Free : अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण (eKYC)) करताना कोणत्याही शेतकऱ्याकडून शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya I.A.S) यांनी दिले आहेत. या संदर्भातील अधिकृत पत्र 24 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि संबंधित शासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य (Farmer Loan Waiver eKYC Free)
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून, महाआयटीच्या ऑनलाइन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
नक्की वाचा: कर्जमाफीच्या ई-केवायसीला तांत्रिक अडथळे; सर्व्हर डाऊनमुळे पात्र शेतकरी चिंतेत
दरम्यान, जिल्ह्यातील काही सेवा केंद्रांवर ई-केवायसी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित सर्व यंत्रणांना कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांकडून पैसे आकारू नयेत, (Farmer Loan Waiver eKYC Free) असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रशासनाने सेवा केंद्र चालकांना शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून, कर्जमाफी योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कोणताही आर्थिक भार न पडता लाभ मिळावा, यावर भर देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करून शुल्क आकारल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने सूचित केले आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान कोणाकडूनही शुल्काची मागणी झाल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


