
Youths’ hunger strike : पारनेर : पारनेर तालुक्यातील पळवे खुर्दच्या (Palve Khurd) हद्दीतील एस.पी.एम.एल.प्रा.लि. कंपनीच्या कामांमध्ये कायमस्वरूपी भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे. या मागणीसाठी युवकांनी सोमवार दि. २७ रोजी उपोषण (Youths’ hunger strike) सुरू केले आहे. मात्र प्रशासन व कंपनी व्यवस्थापन कुठलीही दखल घेत नसल्याने ३० जुलै रोजी आंदोलन व उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा पळवे येथील स्थानिक तरूणांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी (District Collector) व कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
यापुर्वीही स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपीच्या कामासाठी प्राधान्य मिळवे अशी वारंवार मागणी केली होती. मात्र जाणीवपूर्वक भूमिपुत्रांना डावलले जात आहे. आम्ही सर्व पळवे खुर्दच्या गावातील रहिवासी असून आमच्या घरापासून ४०० मीटर अंतरावर कंपनी आहे, आमच्या राहत्या घरापासून जवळ कंपनी असूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचे काम या कंपनीने दिलेले नाही. आमच्या जमिनीचे भूसंपादन झाले असताना व या तालुक्यात सातत्याने दुष्काळाचे सावट असल्याने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आम्ही सर्व भूमीहीन झालो असून आमच्या उपजीविकेसाठी आमच्या हाताला काम मिळावे म्हणून आम्ही आपणांस व कंपनीतील फॅक्टरी व प्रशासकीय अधिकारी या सर्वांना आम्ही निवेदनाद्वारे कामाची मागणी करत आहोत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्थानिक भूमिपुत्र व गावकऱ्यांना डावलल्याचा आराेप (Youths’ hunger strike)
सन २०१८ मध्ये पळवे खुर्द येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अहमदनगर व नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांची व गावकऱ्यांची मीटिंग होऊन कंपनीच्या कामांमध्ये नियमाप्रमाणे स्थानिकांना कामामध्ये प्राधान्य दिले जाईल. असे आश्वासन कागदोपत्री दिले होते परंतु खाजगी कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांना व गावकऱ्यांना डावलण्याचे काम या कंपनीकडून सातत्याने सुरू आहे. तरी स्थानिक भूमिपुत्र हे शेतकरी कष्टकरी गरीब कुटुंबातील युवक असून यांच्या हाताला काम मिळणे हे अपेक्षित होते परंतु या स्थानिक युवकांना कुठलेही काम किंवा रोजगार दिला जात नाही म्हणून तरुण उपोषणाला बसले आहेत. येत्या ३० तारखेला या खाजगी कंपनीने कोणतीही दखल न घेतल्यास आंदोलन व उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशाराही गावकऱ्यांसह युवकांनी दिला आहे.
उपोषणात सचिन इरकर, रामदास इरकर, गणेश बारगळ, रंगनाथ बारगळ, अमोल तरटे, अविनाश गाडीलकर, अक्षय इरकर आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.


