
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : नगर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (Maharashtra Sahitya Parishad Pune) व समर्थ युवा फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) न पुणे येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाचे बोधचिन्ह बनवा स्पर्धा संपूर्ण देशभरात आयोजित केली जात आहे. या स्पर्धेमध्ये सर्व नागरिक, कलाकार, चित्रकार, विद्यार्थी, व्यावसायिक डिझायनर, आदी सर्वजण या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. तरी सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे अशी माहिती मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी दिली.
बोधचिन्ह मध्ये पुढील बाबी असाव्यात
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित केलेल्या या बोधचिन्ह स्पर्धेमध्ये संमेलनाचे बोधचिन्ह तयार करताना, त्या बोधचिन्ह मध्ये पुढील बाबी असाव्यात – पुणे शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि अभिजात मराठी भाषेची वैश्विक ओळख, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, आधुनिकता व भविष्याचा वेध, तसेच संमेलनाचे शंभरावे वर्ष, (शताब्दी) ठळकपणे प्रतिबिंबित झालेले असावे. बोधचिन्ह हे रंगीत असावे. त्याचा आकार मध्यम स्वरूपाचा असावा. विशेष म्हणजे तयार करण्यात येणारे बोधचिन्ह हे पूर्णपणे मूळ स्व. कलाकृती असली पाहिजे ते कोणत्याही विद्यमान डिझाईनची प्रत किंवा कॉपीराईटचे उल्लंघन करणारे नसावे याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच ते पीडीएफ व जेपीजी स्वरूपातही बनवावे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्वतंत्र माहिती जोडणे अनिवार्य (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
बोधचिन्ह तयार करून त्या बोधचिन्हां मध्ये आपण काय प्रतिबिंबित केले आहे. त्याविषयी मराठी भाषेत १०० ते १५० शब्दात स्वतंत्र माहिती जोडणे अनिवार्य आहे. परीक्षकांचा व आयोजन समितीचा निर्णय अंतिम असून, तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील. बोधचिन्हाच्या कागदाच्या मागील बाजूला स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, व संकल्पना स्पष्टीकरण जोडणे महत्त्वाचे आहे.
बोधचिन्ह तयार करून ते २० ऑगस्ट २०२६ पर्यंत उदय मेडिकल , एम.जी रोड, कापड बाजार, अहिल्यानगर येथे समक्ष जमा करावे. विजेत्या स्पर्धकाला ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह व जिल्हा प्रमुख श्री. जयंत येलुलकर ,व अ.नगर जिल्हा प्रमुख प्रा. गणेश भगत यांनी केले अधिक माहितीसाठी मोबा.९६०७३९५१७३ व मोबा. ९४९४०९८८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.


