Police raid on illegal liquor sale : कोपरगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; तिघांना अटक

Police raid on illegal liquor sale : कोपरगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; तिघांना अटक

0
Police raid on illegal liquor sale : कोपरगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; तिघांना अटक
Police raid on illegal liquor sale : कोपरगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; तिघांना अटक

Police raid on illegal liquor sale : नगर : कोपरगाव तालुका पोलिसांनी (Kopargaon Taluka Police) अवैध देशी व विदेशी दारू विक्री (Police raid on illegal liquor sale) करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत तीन जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण १५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल (Cases registered under the Prohibition Act) करण्यात आले आहेत.

१५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

निलेश ताराचंद ब्राम्हणे (रा. चासनळी), दत्तु खंडू गांगवे (रा. धारणगाव) आणि हॅप्पी श्रीराम पंजाबी (रा. पोहेगाव), असे दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. या बाबत माहिती अशी की, कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार धारणगाव चासनळी तसेच दरडे फाटा या परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने निलेश ताराचंद ब्राम्हणे (रा. चासनळी), दत्तु खंडू गांगवे (रा. धारणगाव) आणि हॅप्पी श्रीराम पंजाबी (रा. पोहेगाव) यांना अवैधरित्या दारू विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान एकूण १५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल (Police raid on illegal liquor sale)

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाला आहे.


ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस आमदार जयदिप गवारे, किसन सानप आणि आंबादास वाघ यांच्या पथकाने केली आहे.