
Kotwali Police Station : नगर : घासगल्ली येथील एका दुकानात खराब स्टील बॉटल बदलून देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला मारहाण (Assault on a woman and her son) करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २८) सायंकाळी घडली. या झटापटीत महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी (Death threat) देण्यात आली तसेच गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी इमाद कमरुद्दीन सय्यद, आसीम कमरुद्दीन सय्यद, सगीर जाकीर शेख, अश्कान शेख (पूर्ण नाव माहिती नाही) तसेच अन्य ५ ते ९ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने दिली फिर्याद
याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी घासगल्ली येथील घरसंसार दुकानातून १५० रुपयांची स्टीलची पाण्याची बाटली खरेदी केली होती. मात्र ती खराब निघाल्याने फिर्यादी त्यांचा मुलगा अश्पाकसोबत बाटली बदलून देण्याची मागणी करण्यासाठी दुकानात गेल्या होत्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
८ ते ९ जणांनीही मारहाण केल्याचा आरोप(Kotwali Police Station)
बाटली बदलून देण्यास नकार दिल्यानंतर दुकानातील इमाद कमरुद्दीन सय्यद याच्याशी वाद झाला. फिर्यादी व त्यांचा मुलगा दुकानाबाहेर निघत असताना इमाद सय्यद याने अश्पाकला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे आलेल्या अन्य ८ ते ९ जणांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. यातील एका व्यक्तीने लाकडी दांडक्याने तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


