Rahul Gandhi Lok Sabha Speech: “अमित शहांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेटगन चालवण्याचा आदेश दिला”-राहुल गांधी

Rahul Gandhi Lok Sabha Speech: "अमित शहांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेटगन चालवण्याचा आदेश दिला"-राहुल गांधी

0
Rahul Gandhi Lok Sabha Speech:
Rahul Gandhi Lok Sabha Speech: "अमित शहांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेटगन चालवण्याचा आदेश दिला"-राहुल गांधी

Rahul Gandhi Lok Sabha Speech: दिल्लीतील जंतरमंतर (jantar mantar) येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, तसेच पॅलेट गनचा वापर केला, तोच मुद्दा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उचलून धरला. पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेटगन वापरण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले, असे आरोप राहुल गांधींनी लोकसभेत अमित शहांवर लावले. त्यामुळे लोकसभेतले वातावरण चांगलेच तापले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी सवाल उपस्थीत केला. ते म्हणाले , तुमच्याकडे काय पुरावा आहे, की अमित शहांनीच पोलिसांना पॅलेटगन वापरण्यास सांगितले.

देशात विद्यार्थी, मूर्ख आणि मूर्खाला देव मानणारे अंधभक्त (Rahul Gandhi)

लोकसभेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलक विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा राग योग्य असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. “जगात तीन प्रकारचे लोक आहेत – विद्यार्थी, मूर्ख आणि मूर्खाला देव मानणारे अंधभक्त,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकाही केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यावरही निशाणा साधत, “शिक्षण मंत्रालय त्यांनी नाही तर आरएसएसने चालवलं आहे. देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरू आरएसएसशी संबंधित आहे,” असा आरोपही त्यांनी केला. तसेच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करत, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, बंदुका आणि पॅलेट गन वापरण्याचे आदेश त्यांनीच दिल्याचा दावा राहुल गांधीनी केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राहुल गांधींच्या आरोपांना संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी कडाडून विरोध केला. “राहुल गांधी हे आरोप कोणत्या आधारावर करत आहेत? त्यांनी खोटे आरोप केल्याबद्दल सभागृहाची माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली. “आम्हीही तुमच्यावर एखाद्याची हत्या केल्याचा आरोप करू का?” असा सवालही रिजीजू यांनी उपस्थित केला.

हे वाचा : मनोज जरांगेंनी मोठा निर्णय घेतला; 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाचं शेवटचं आंंदोलन

“मी फक्त सत्य बोलले” प्रियंका गांधींची प्रल्हाद जोशींवर टीका (Rahul Gandhi)

दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही सरकारवर निशाणा साधला. “मी फक्त सत्य बोलले. सत्य बोलल्याबद्दल शिक्षा करायची असेल तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण मी सत्य बोलत राहीन,” असे त्या म्हणाल्या. याशिवाय, मंगळुरूमधील एका पबमध्ये महिलांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्यावर टीका केली. “या प्रकरणातील संबंधित व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. नंतर त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले असले तरी त्याचे भाजपमध्ये प्रवेशाचे फोटो उपलब्ध आहेत. ही केवळ एका घटनेची बाब नसून महिलांप्रती असलेल्या त्यांच्या विचारसरणीचे ते प्रतीक आहे,” असे म्हणत प्रियांका गांधी यांनी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला.