LCB cracks down on illegal activities : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल

LCB cracks down on illegal activities : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल

0
LCB cracks down on illegal activities : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल
LCB cracks down on illegal activities : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल

सव्वा लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

LCB cracks down on illegal activities : नगर : जिल्ह्यातील अवैध दारू विक्री (Illegal liquor sales) व जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.२८) धडक कारवाई (LCB cracks down on illegal activities) करत २१ गुन्हे दाखल केले. या कारवाईत १० अवैध दारू विक्रेत्यांवर आणि ११ जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाई एक लाख ३२ हजार ६७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन विशेष पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे नियोजन केले होते. त्यानुसार २८ जुलै रोजी तोफखाना, भिंगार कॅम्प, अकोले आणि शेवगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

एकूण १० गुन्ह्यांची नोंद

अवैध दारू विक्रीप्रकरणी भिंगार कॅम्प येथे एक, अकोले येथे चार आणि शेवगाव येथे पाच अशा एकूण १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या कारवाईत एक लाख ८ हजार ३७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यापुढेही तीव्र कारवाई करण्यात येणार (LCB cracks down on illegal activities)

तर, जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईत तोफखाना येथे चार, भिंगार कॅम्प येथे चार, अकोले येथे दोन आणि शेवगाव येथे एक असे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदीप दरवडे व पोलीस अंमलदार शाहिद शेख, राहुल द्वारके, विजय पवार, गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, निलकंठ कारखेले, अशोक लिपणे, राहुल डोके, रोहित येमुल, सागर सासणे, बाळासाहेब गुंजाळ, भगवान सानप, सतिष भवर योगेश कर्डिले, चालक भगवान धुळे, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले.