Dr. Sujay Vikhe : गुन्हेगारांना मुभा नाही, आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार : डॉ. सुजय विखे

शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

0
Dr. Sujay Vikhe Patil : गुन्हेगारांना मुभा नाही, आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार : डॉ. सुजय विखे
Dr. Sujay Vikhe Patil : गुन्हेगारांना मुभा नाही, आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार : डॉ. सुजय विखे

Dr. Sujay Vikhe Patil : राहाता : शिर्डीतील खून (Murder) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्यासह मंदिर परिसरातील अतिक्रमण (Encroachment) व अनधिकृत व्यवसायांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिली.

क्की वाचा : कंपनीकडून स्थानिकांना डावलल्याच्या निषेधार्थ पळवे येथील तरुणांचे उपोषण

पथविक्रेत्यांसाठी स्वतंत्र हॉकर झोन

खून प्रकरणातील आरोपीच्या अतिक्रमित घराला नोटीस बजावण्यात आली असून, आठवडाभरात अतिक्रमण न हटवल्यास नगरपंचायतीमार्फत ते हटविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.मंदिर परिसरात अनधिकृत विक्रीला पूर्णतः बंदी घालून पथविक्रेत्यांसाठी स्वतंत्र हॉकर झोन तयार केला जाणार आहे. व्यवसायासाठी नियमावली ग्रामस्थ, व्यापारी व संबंधित घटकांच्या सहभागातून तयार केली जाईल. भाविकांची फसवणूक, जादा दर आकारणी किंवा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांसह संबंधित दुकानमालक व जागामालकांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक (Dr. Sujay Vikhe Patil)

साई संस्थानने पूजासाहित्य विक्रीबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज व्यक्त करत, पथविक्रेत्यांसाठीची अंतिम नियमावली आठवडाभरात जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करणाऱ्या शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.