Sispe Infinity Scam : नगर : सिस्पे घोटाळ्याप्रकरणी (Sispe Infinity Scam) अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात असलेला राहुल श्यामराव काळोखे याला अखेर इंटरपोलच्या (Interpol) मदतीने फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आले. खरंतर कोट्यवधींचा घोटाळा या सिस्पे प्रकरणात झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. मात्र अखेर यामधील मास्टरमाइंडला अटक झाली. मात्र, या कामगिरीचे श्रेय घेण्यासाठी आता विखे व लंकेंमध्ये (Vikhe and Lanke) रस्सीखेच सुरु झाली.
नक्की वाचा : महायुती सरकारच्या पाठपुराव्याला यश; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंडला फिजीमधून अटक
आरोपीच्या शोधासाठी 196 देशाची यंत्रणा कामाला
राहुल काळोखे याच्याविरोधात जानेवारी महिन्यात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसमुळे जगभरातील 196 देशांच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्याचा शोध घेण्यासाठी अधिकृत माहिती पाठविण्यात आली. त्यानंतर तो फिजीमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला भारतात आणण्यात येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विखे – लंकेंमध्ये श्रेयवादाची लढाई (Sispe Infinity Scam)
सिसपे प्रकरणावरून खासदार निलेश लंके व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. आरोपीला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली काही लोकप्रतिनिधी त्याला सहकार्य करतात अशा शब्दात विखे यांनी लंके यांच्यावर निशाणा साधला होता. सिसपे प्रकरणातील आरोपीना अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा केला अशा शब्दात लंके यांनी विखेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. तसेच कि काही लोक केवळ बोलघेवडे असतात. मंचावर जाऊन मोठमोठया गप्पा मारायच्या तर दुसरा वर्ग जो असतो तो प्रामाणिक काम करणारा असतो. अशा शब्दात विखेंना खोचक टोला देखील लंके यांनी लगावला.
विखे समर्थकांकडून दावा
सिसपे प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधत आवश्यक स्तरावर पत्रव्यवहार करून तपास प्रक्रियेला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यानंतर आरोपीचा माग काढून त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. असल्याचा दावा विखे समर्थकांकडून केला जातो आहे. तर या प्रकरणाचा सुरुवातीपासून शासनस्तरावर आपण पाठपुरावा करतो आहे, असा दावा खासदार लंके यांनी केला. यामुळे आरोपी गजाआड झाला असला तरी याचे श्रेय घेण्यासाठी आता लंके व विखे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे.
आरोपीच्या शोधासाठी दुबईत टीम पाठवली …लंकेंचा दावा
सिसपे प्रकरणी खासदार लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या प्रकरणातील आरोपी यांच्याबाबत आम्हाला माहिती मिळाली कि हे आरोपी दुबईत आहे. सप्टेंबरमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांची टीम दुबईला पाठवली व आरोपीबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. आरोपींना अटक व्हावी यासाठी अमित शाह यांची देखील भेट घेतली. सातत्याने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा आम्ही सुरु ठेवला. इंटरपोलची कारवाई होणार त्यापूर्वी आरोपी काळोखे दुबईतून फिजी याठिकाणी पळाला याबाबत प्रशासनाला आम्ही कळवले असा दावा देखील यावेळी खासदार निलेश लंके यांनी केला.



