Case Registered : कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल; मुख्य आरोपी जेरबंद, पाथर्डीतील घटना

मोटारसायकल आडवी लावून मुलीला गाठले

0
Case Registered : कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल; मुख्य आरोपी जेरबंद, पाथर्डीतील घटना
Case Registered : कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल; मुख्य आरोपी जेरबंद, पाथर्डीतील घटना

Case Registered : पाथर्डी : तालुक्यातील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा रोज पाठलाग करून छेड काढणाऱ्या तीन रोडरोमिओंविरुद्ध पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Case Registered) केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी (Main accused) रामेश्वर पांडुरंग जमादार (रा. मोहरी, ता. पाथर्डी) याला पोलिसांनी वनदेव परिसरातून तातडीने ताब्यात घेतले असून, त्याचे इतर दोन साथीदार पसार झाले आहेत. पीडित मुलीच्या आईने दाखवलेल्या धाडसामुळे आणि आरोपींची मोटारसायकल पकडून ठेवल्यामुळे पोलिसांना या विकृतांचा माग काढणे शक्य झाले.

नक्की वाचा : गर्दीत नकळत गळून पडलेले गळ्यातले केले परत; सोन्यापेक्षा मौल्यवान ठरला प्रामाणिकपणा

मोटारसायकल आडवी लावून मुलीला गाठले

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ग्रामीण भागातून रोज पाथर्डी शहरात शिक्षण घेण्यासाठी येते. मोहरी येथील रामेश्वर जमादार, पांडुरंग नरोटे आणि नारायण सुसलादे हे तिघे जण रोज मोटारसायकलवरून या विद्यार्थिनीचा पाठलाग करून. तिला रस्त्यात गाठून रोज काहीतरी बोलून तिची छेड काढायचे. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या घरी सांगितला. मुलीच्या सुरक्षेसाठी गुरुवारी तिची आई स्वतः तिच्यासोबत विद्यालयात आली आणि शाळा सुटेपर्यंत प्रवेशद्वारावर थांबली. दुपारी सव्वा बारा वाजता शाळा सुटल्यानंतर मुली बस स्थानकाकडे निघाल्या. त्याच वेळी विद्यालयाच्या समोरच या तिघांनी मोटारसायकल आडवी लावून मुलीला गाठले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

घटनास्थळी धाव घेत मोटारसायकल जप्त (Case Registered)

“तू मला फार आवडतेस, कॅडबरी घे,” असे म्हणून तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, इतर दोघांनी “तू आमच्या विरोधात कुठेही जा, आम्ही कोणाला घाबरत नाही,” अशी उघड दमदाटीही केली.हा प्रकार पाहताच पाठीमागून मुलीची आई धावत आली. तिने आरोपींना पकडण्याचा धाडसी प्रयत्न केला. आईला समोर येताना पाहून तिन्ही आरोपी घाबरले आणि आपली मोटारसायकल घटनास्थळीच सोडून पळून गेले. यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ती मोटारसायकल जप्त केली आणि गाडी मालकाचा शोध घेतला असता, ती मोहरी येथील असल्याचे निष्पन्न झाले.गुन्हा केल्यानंतर आरोपी रामेश्वर जमादार हा पाथर्डी शहरातील वनदेव परिसरात पायी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ चक्र फिरवून वनदेव परिसरातून त्याला ताब्यात घेतले. 

संघटित होऊन लढा देण्याची गरज

मात्र, त्याचे साथीदार नारायण सुसलादे आणि पांडुरंग नरोटे (दोघे रा. मोहरी) हे पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पीडित मुलीने दाखवलेले धाडस आणि तिच्या आईने दाखवलेली तत्परता यामुळे या छेडखोरांना चांगलाच धडा मिळाला आहे. मात्र, शाळा-कॉलेजच्या परिसरात मुलींचा पाठलाग करणाऱ्या अशा विकृतींविरुद्ध समाजाने संघटित होऊन लढा देण्याची गरज आता निर्माण झाली आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद आणि सागर बुधवंत यांच्या पथकाने केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.