Online Darshan Fraud : त्र्यंबकेश्वरलाही शनिशिंगणापूरसारखा ‘ऑनलाइन दर्शन फ्रॉड’ बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक

Online Darshan Fraud : त्र्यंबकेश्वरलाही शनिशिंगणापूरसारखा ‘ऑनलाइन दर्शन फ्रॉड’ बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक

0
Online Darshan Fraud : त्र्यंबकेश्वरलाही शनिशिंगणापूरसारखा ‘ऑनलाइन दर्शन फ्रॉड’ बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक
Online Darshan Fraud : त्र्यंबकेश्वरलाही शनिशिंगणापूरसारखा ‘ऑनलाइन दर्शन फ्रॉड’ बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक

Online Darshan Fraud : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथील ‘ऑनलाइन दर्शन फ्रॉड’चा (Online Darshan Fraud) तपास अद्याप पूर्ण होऊन संबंधितांना शिक्षा व्हायची आहे. तोपर्यंतच अशाच प्रकाराचा फ्रॉड आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थाननच्या (Trimbakeshwar Temple) बाबतीच सुरू झाल्याचे उघड झाले आहे. तेथेही देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या ऑनलाइन दर्शन सुविधाचा गैरफायदा उठवत आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत अनेकांनी हे प्रकार सुरू केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने पोलिसांत धाव घेतली आहे.

बनावट वेबसाईट तयार करुन भाविकांची लूट

शनिशिंगणापूर येथे गेल्यावर्षी जुलै महिन्यात हा प्रकार उघडकीस आला होता. यातून कोट्यवधी रुपये लुबाडण्यात आल्याचा आरोप झाला होता. देवस्थान ट्रस्टने अधिकृतपणे ऑनलाइन दर्शन सुविधा सुरू केली होती. काही कारणामुळे ती बंद केली. मात्र, मधल्या काळात अनेक बनावट मोबाईल ॲप आणि वेबसाईट तयार केल्या जाऊन त्याद्वारे भाविकांची लूट केली. यात देवस्थानचे काही कर्मचारी असल्याचाही आरोप झाला. हा प्रकार अधिवेशनात गाजला. चौकशीचा आदेश झाला. त्यानंतर देवस्थानचे विश्वस्त मंडळ सुद्धा बरखास्त झाले. मूळ प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बनावट ॲपद्वारे चक्क डिस्काउंट ऑफर दिल्या (Online Darshan Fraud)

आता असाच प्रकार त्र्यंबकेश्वरला सुरू असल्याचे उघड झाले आहे. तेथेही देवस्थानने अधिकृतपणे अशी सुविधा सुरू केली आहे, त्यानुसार देवस्थान ट्रस्टच्या संकेतस्थळावर २१०० रुपये भरून पूजा बुक होते. नाव, गोत्र भरायचे, पुरोहित पूजा करतात, फोटो-व्हिडीओ येतो आणि दक्षिणेचे ६० टक्के पुरोहितांना, तर ४० टक्के ट्रस्टला मिळतात.

मात्र, यावर अधारित अनेक बनावट ॲप तयार करण्यात आले आहेत. तेथेही चक्क डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. अवघ्या २१, ५१ किंवा १०१ रुपयांत अभिषेक, फोटो आणि व्हिडीओ देण्याचे सांगितले जात आहे. अनेक भाविक त्याद्वारे पूजा करण्याचा पर्याय निवडत आहेत. भाविकांचा विश्वास बसण्यासाठी ही मंडळी ट्रस्टच्या नावाचा, मंदिराच्या छायाचित्रांचा आणि धार्मिक माहितीचा अनधिकृत वापर करून बनावट संकेतस्थळे, मोबाइल ॲप आणि सोशल मीडियावर जाहिराती करीत आहेत. ‘श्रावण सोमवार जलाभिषेक’, ‘गोदावरी जलाभिषेक’, ‘बिल्वपत्र अभिषेक’, ‘विशेष अभिषेक’ अशा सेवा उपलब्ध असल्याचा आभास निर्माण करून भाविकांकडून पैसे घेतले जात आहेत.
या विरोधात आता ट्रस्टने पोलिसांत धाव घेतली आहे. यामध्ये भाविकांची, तसेच देवस्थानची फसवणूक असल्याची तक्रार करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात हे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने वेळीच कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी अमित माचवे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावाने काही जणांनी बनावट मोबाइल ॲप तयार केल्याचे आढऴून येते. त्याद्वारे भाविकांची व देवस्थान ट्रस्टची फसवणूक होत आहे. यावर सायबर गुन्हे शाखेकडून कारवाई होण्याची गरज आहे.