Kotwali Police Station : गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या 4 जणांना कोतवाली पोलिसांकडून रंगेहाथ अटक

Kotwali Police Station : गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या 4 जणांना कोतवाली पोलिसांकडून रंगेहाथ अटक

0
Kotwali Police Station : गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या 4 जणांना कोतवाली पोलिसांकडून रंगेहाथ अटक
Kotwali Police Station : गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या 4 जणांना कोतवाली पोलिसांकडून रंगेहाथ अटक

Kotwali Police Station : अहिल्यानगर : कोतवाली पोलीस स्टेशनच्या (Kotwali Police Station) गुन्हे शोध पथकाने (Crime Detection Squad) मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या 4 जणांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून 1.5 क्विंटल गोमांसासह 32,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना कशी उघडकीस आली?

दि. 02 आॅगस्ट रोजी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर येथे काही इसम गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी तेथे 4 इसम मांस विक्री करताना आढळून आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पकडण्यात आलेले आरोपी (Kotwali Police Station)

नावेद सादिक कुरेशी वय 40 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, कुरेशी मस्जिद जवळ, झेंडीगेट, अहिल्यानगरकैफ अब्दुल मस्जिद कुरेशी वय 21 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, कुरेशी मस्जिद जवळ, झेंडीगेट, अहिल्यानगर फैजान रौफ कुरेशी वय 19 वर्षे, रा. सदर बाजार, भिंगार, ता. जि. अहिल्यानगरमोहम्मद अफशान शाकिर कुरेशी वय 18 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, कुरेशी मस्जिद जवळ, झेंडीगेट, अहिल्यानगर


पोलिसांनी आरोपींकडून एकूण 150 किलो गोमांस, वजनकाटा, सत्तूर आणि चाकू असा एकूण 32,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/1 राहुल एन. शिंदे करत आहेत.

पोलिसांची कारवाई (Kotwali Police Station)

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने केली आहे.या कारवाईत पोसई गणेश देशमुख, सफौ संतोष बनकर यांच्यासह 20 हून अधिक पोलीस अंमलदार सहभागी होते.