Competition : थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा

0
Competition : थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा
Competition : थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा

Competition : नगर : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून नवीन पिढीला त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय व्हावा, या उद्देशाने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये तसेच खुल्या गटातील जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

हे वाचा – संगमनेर तालुक्यातील सातवा मैल फाट्याजवळ भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

समितीमध्ये यांचा समावेश

या उपक्रमासाठी अमृत संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलेल्या ‘पराक्रम दिन समिती’मध्ये इतिहास तज्ज्ञ व अभ्यासक काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर व कौमुदी परांजपे यांचा समावेश आहे. अठराव्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे, अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे, त्यांचे संघटन कौशल्य, युद्धनीती, स्वामीनिष्ठा, दिल्ली मोहीम, बुंडेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते तसेच त्यांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय हे विषय निबंध, वक्तृत्व व रिल्स या सर्व स्पर्धांसाठी सामायिक ठेवण्यात आले आहेत.

नक्की पहा : नियम मोडणाऱ्या दुचाकी वाहनांवर तोफखाना पोलिसांची कारवाई

इथे करा नोंदणी (Competition)

निबंध व वक्तृत्व स्पर्धांसाठी लागणारे संदर्भ ‘अमृत पराक्रम दिन’च्या अधिकृत संकेतस्थळावरील लिंक्स, संदर्भ पुस्तके व माहिती पुस्तिकेवर आधारित असणे आवश्यक आहे. समितीने निश्चित केलेल्या संदर्भ पुस्तकांची यादी तसेच थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवनप्रवास उलगडणारे ई-बुक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यावर आधारित प्रश्नावलीही तयार करण्यात आली आहे. स्पर्धांचे स्वरूप, विषय, नियमावली, बक्षिसे व प्रवेशिका सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती https://parakramdin.mahaamrut.org.in/# या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय, अहिल्यानगर येथील ९११२२२८७६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.