
Schoolgirl dies after being hit by a car : संगमनेर : संगमनेर – अकोले रस्त्यावरील सातवा मैल फाट्याजवळ रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणारा अपघात (Accident) घडला. भरधाव वेगात आलेल्या एका वाहन चालकाने बेफिकीरपणे गाडी चालवून एका १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या स्कुटीला जोरदार धडक (Schoolgirl dies after being hit by a car) दिली. धडक दिल्यानंतर विद्यार्थिनीला गाडीसह तब्बल २०० फूट अंतरापर्यंत ओढत नेले, ज्यामध्ये गंभीर जखमी होऊन या विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आरुषी अनिल कर्पे (वय १६, रा. पिंपळगाव कौझिरा, ता. संगमनेर) असे या दुर्दैवी मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
पिंपळगाव कौझिरा येथील रहिवासी असलेली आरुषी कर्पे ही रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिच्या इलेक्ट्रिक स्कुटीवरून (मोपेड) शाळेच्या क्लाससाठी संगमनेर शहराकडे जात होती. ती सातवा मैल फाट्याजवळ पोहोचली असता, संगमनेर बाजूकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने (क्र.एमएच १० डीव्ही ३४४७) तिला समोरून जोरदार धडक दिली. सदर रस्ता रहदारीचा आणि स्पीड ब्रेकर असलेला असतानाही, स्कॉर्पिओ चालकाने वाहनाचा वेग मर्यादित न ठेवता अतिशय निष्काळजीपणे व धोकादायकरित्या गाडी चालवली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओने आरुषीला तिच्या वाहनासह सुमारे २०० फुटांपर्यंत ओढत नेले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने आरुषीचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह आणि जखमी अवस्थेतील तपासणी ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वाहनचालकाविरूद्ध फिर्याद (Schoolgirl dies after being hit by a car)
याप्रकरणी मृत विद्यार्थिनीचे काका भागवत कर्पे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून वाहन चालक हेमंत बाळासाहेब गिते (वय ३१, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. ४१७/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, २८१, ३२४(४) मोटार वाहन कायदा कलम १८५, १८४ , १७७ प्रमाणे नोंदवण्यात आला आहे.
चालकाला आपल्या कृत्यामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असतानाही त्याने जाणीवपूर्वक बेदरकारपणे गाडी चालवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला माहिती प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एन. काळे यांनी तातडीने घटनास्थळाचा आढावा घेतला. पुढील तपास सपोनि व्ही. एन. काळे करत आहेत.


