Ashok Gaikwad | ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड काळाच्या पडद्याआड

0

Ashok Gaikwad | नगर : ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड (वय ७२) (Ashok Gaikwad) यांचे आज (ता.२) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या (ता. ३) दुपारी १२ वाजता अमरधाम (नालेगाव) अहिल्यानगर येथे होणार आहे.

नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा

त्यांना ब्रेन हॅमरेज (Ashok Gaikwad)

ते श्रीरामपूरमध्ये पक्षाच्या कामासाठी काल (ता. १) गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना अहिल्यानगरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यात त्यांचे निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. दलित पँथर संघटनेते त्यांनी काम केले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनेक वर्ष जिल्ह्यातील मोठे नेते (Ashok Gaikwad)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे ते अनेक वर्ष जिल्ह्यातील मोठे नेते होते. अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ग्रामीण भागातून येत त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला होता. संघर्षशील, अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे मूळ गाव कवडगाव (ता. पाथर्डी) होते. त्यांचे आजोळ चांदे (ता. नेवासा) आहे. चांद्यात प्राथमिक तर सोनई येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी शैक्षणिक प्रश्नांसाठी आंदोलने केली. दलित पँथर फुटल्यावर त्यांनी आरपीआयच्या आठवले गटात प्रवेश केला. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मूळा सहकारी साखर कारखान्यात त्यांनी संचालक पदही भूषविले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here