Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा

सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही

0
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा

Sunetra Pawar : पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड यांच्यासह त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पारनेर-नगर विधानसभा (Parner-Nagar Assembly Constituency) मतदारसंघातील राजकीय, सामाजिक परिस्थिती तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नक्की वाचा : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान

विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

यावेळी आमदार काशिनाथ दाते यांनी मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती, प्रलंबित प्रकल्प, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शेतकरी हिताच्या योजना तसेच आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विकासकामांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी, सामाजिक वातावरण, संघटनात्मक स्थिती तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही (Sunetra Pawar)

नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि विकासाला गती देण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घेत त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकासकामांसाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार व्यक्त केले. शासनाच्या बळावर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here