
Shrigonda Bus Station : श्रीगोंदा : बस स्थानकात (Shrigonda Bus Station) खासदार निलेश लंके यांनी शनिवारी (ता. १) सायंकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी थेट सामान्य प्रवाशाप्रमाणे बस स्थानकात प्रवेश करून ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting Operation) केले. या वेळी बस स्थानकातील साचलेला कचरा, दुर्गंधी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहून खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असून परिस्थिती सुधारण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे.श्रीगोंदा बस स्थानकाची झालेली दयनीय अवस्था पाहून खासदार लंके यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा
अस्वच्छतेबाबत खासदार लंके यांच्याकडे तक्रारी
निलेश लंके श्रीगोंदा दौऱ्यावर असताना कोणत्याही औपचारिकतेशिवाय थेट श्रीगोंदा बस स्थानकातील प्लॅटफॉर्मवर बसून तेथील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता प्रवाशांनी बस स्थानकातील अस्वच्छतेबाबत खासदार लंके यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत सायंकाळी ४ वाजता खासदार स्वतः बस स्थानकात पोहोचले. त्या वेळी प्रवाशांच्या बाकाखाली व परिसरात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांच्या कागदांचा खच पडलेला दिसला. गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छताच झाली नसल्याचे स्पष्ट होत होते. महिला व पुरुषांच्या स्वच्छतागृहात प्रचंड दुर्गंधी पसरली होती, तर हात धुण्यासाठी साधे पाणीही उपलब्ध नव्हते. स्वच्छतेची जबाबदारी असलेले कर्मचारी कामावरून गायब असल्याचे पाहून खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बदल न झाल्यास आंदोलनाचा इशारा (Shrigonda Bus Station)
प्रवाशांची होणारी कुचंबना पाहून संतप्त झालेल्या खासदारांनी प्रभारी आगार प्रमुखांना धारेवर धरत “करोडो रुपयांचा निधी येतो, मग स्वच्छतेसाठी १ रुपयाही खर्च होत नाही का? एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे, मग प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सोयींचा विचार का केला जात नाही?” असा जाब विचारत खासदारांनी सात दिवसांच्या आत संपूर्ण बस स्थानक परिसर चकाचक झाला पाहिजे. स्वच्छतागृहे २४ तास स्वच्छ व सुरू राहिली पाहिजेत. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सोय उपलब्ध करून द्यावी. “सात दिवसांत बदल झाला नाही, तर मी स्वतः बस स्थानकात बसून तीव्र आंदोलन करेन,” असा इशारा त्यांनी दिला.


