Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान 

३ लाखाहून अधिक भक्तांनी घेतले साईबाबांचे दर्शन

0
Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान
Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान

Sri Saibaba Sansthan : राहाता : श्री साईबाबा संस्थान (Sri Saibaba Sansthan) विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने बुधवार (ता. २८) ते शुक्रवार (ता. ३०) या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा (Guru Purnima) उत्सवाला देश-विदेशातील साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या तीन दिवसांच्या उत्सवादरम्यान संस्थानला एकूण रुपये ०७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (Goraksh Gadilkar) यांनी दिली.

नक्की वाचा : कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल; मुख्य आरोपी जेरबंद, पाथर्डीतील घटना

Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान
Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान

३ लाखाहून अधिक भक्तांनी घेतले साईबाबांचे दर्शन

देणगीमध्ये दक्षिणा पेटीत २ कोटी ४ लाख ३५ हजार ५५७रुपये, देणगी काऊंटरवर १ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५ रुपये, पी.आर.ओ. देणगी ८७ लाख १४ हजाररुपये, तसेच डेबीट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डी.डी. देणगी व मनी ऑर्डरद्वारे मिळून २ कोटी ७ लाख ८४ हजार ७०१ रुपये प्राप्त झाले. परकीय चलनाद्वारे ५ लाख ६५ हजार ९९१ रुपये संस्थानला प्राप्त झाले. उत्सवादरम्यान १,१२५.५७० ग्रॅम सोने प्राप्त झाले असून त्याचे मूल्य १ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४ रुपये इतके आहे. तसेच चांदी २,३७६.५०० ग्रॅम प्राप्त झाली असून तिचे मूल्य ३ लाख ९० हजार ६४९ रुपये इतके आहे.गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कालावधीत ३ लाखाहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान
Sri Saibaba Sansthan : गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी सुमारे आठ कोटीचे दान

३९ हजार ६११ अन्नप्रसाद पाकिटांचे वितरण (Sri Saibaba Sansthan)

श्री साईप्रसादालयामार्फत १ लाख ९४ हजार २८५ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर ३९ हजार ६११ अन्नप्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. दर्शन रांगेतील १ लाख ६५ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. याच कालावधीत सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून ७१ लाख ७ हजार ३६० रुपये उत्पन्न प्राप्त झाले. उत्सवासाठी आलेल्या हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्तनिवास, साईधर्मशाळा तसेच अतिरिक्त निवासासाठी उभारण्यात आलेल्या मंडपांमधील निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. साईधर्मशाळेत विविध भागांतून आलेल्या ३९ पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांचीही निवास व्यवस्था करण्यात आली. 

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन, प्रसाद, निवास, स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य सेवा व वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्यात आल्याने लाखो साईभक्तांनी उत्सवाचा आनंद घेतल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.