Prajakt Tanpure | माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू – आमदार प्राजक्त तनपुरे

0

Prajakt Tanpure | नगर : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकांसमोरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी निश्चित पाठपुरावा करू. तसेच गावपातळीवरील राजकारणातही माजी सैनिकांना योग्य स्थान व सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केले.

हे वाचा – संगमनेर तालुक्यातील सातवा मैल फाट्याजवळ भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे उद्घाटन (Prajakt Tanpure)

अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अक्षय कर्डिले, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष अशोक चौधरी, विनोद परदेसी, शिवाजी पालवे, त्रिदल सेवा संघाचे अध्यक्ष नारायण झिने, उपाध्यक्ष हरिराम शिंदे, सचिव विठ्ठल पारकडं, कार्याध्यक्ष पांडुरंग गुंड, अंकुश घोरपडे, गणेश आढाव, संतोष झिने, धनाराज साबळे, उद्धव झिने, बापू भोसले, बबन झिने, सोमेश्वर गायकवाड, संजय म्हस्के, गोवर्धन गर्जे, सरपंच राधिका प्रभुणे, सुभाष झिने, मेहरनाथ कलचुरी, जालिंदर कदम, भाऊसाहेब रानमाळ, प्रकाश चव्हाण, शिवाजी ज्ञानदेव कदम, भीमराजा आरेकर, अंबादास कांडेकर, शिवाजी पालवे, विनोद सिंग परदेशी, नीलकंठ उल्हारे, मनसुख वाबळे, सदाशिव भोळकर यांच्यासह त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा

सैनिकांच्या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षित (Prajakt Tanpure)

आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, की देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या योगदानाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. सैनिकांच्या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेबद्दल समाजाने कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. ग्रामीण भागातील ही पहिली माजी सैनिक संघटना असून, माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ती प्रभावीपणे काम करेल. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच परंपरेत आपणही त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी माजी सैनिक गोवर्धन गर्जे यांनी माजी सैनिकांच्या मुलांसाठी प्रस्तावित वस्तीगृहाचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न उपस्थित केला. डीपीआरमधून निधी उपलब्ध करून वस्तीगृहाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आमदार कर्डिले यांनी दिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कार्यक्रमानिमित्त पिंपळगाव माळवी येथे माजी सैनिक व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर अमर जवान स्मारकास अभिवादन करून स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले. त्रिदल संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात माजी सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि विधान परिषदेत माजी सैनिकांसाठी प्रतिनिधित्वाची व्यवस्था व्हावी, यासाठी संघटित होऊन पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी सैनिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांचे लोकप्रतिनिधित्व वाढणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी सैनिकांनी आपल्या भावना व मनोगते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here