Karuna Sharma on Pankaja Munde : ‘पंकजा अन् धनंजय मुंडेंनी गलिच्छ राजकारण केलंय’,करुणा शर्मांची टीका

0
Karuna Sharma on Pankaja Munde : 'पंकजा अन् धनंजय मुंडेंनी गलिच्छ राजकारण केलंय',करुणा शर्मांची टीका
Karuna Sharma on Pankaja Munde : 'पंकजा अन् धनंजय मुंडेंनी गलिच्छ राजकारण केलंय',करुणा शर्मांची टीका

नगर : पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनीच गलिच्छ राजकारण केलं आहे, त्यामुळे दोघांनीही राजकारणातून एक्झिट घ्यावी,अशी मागणी करुणा शर्मा (Karuna Sharma on Pankaja Munde)यांनी केली आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजकारणातील निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता करुणा शर्मा यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. तसेच परळी येथे त्यांच्या एक्झिटसाठी स्वखर्चाने सभा घेण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. करुणा शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

नक्की वाचा : बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतचा कारावास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’कायदा काय?

‘दोन्ही भाऊ-बहिणींनी राजकारणातून एक्झिट घ्यावी’ (Karuna Sharma on Pankaja Munde)

करुणा शर्मा म्हणाल्या, “जसे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना वाटत आहे की, एक्झिट व्हायचे आहे. तुम्ही दोघांनीच गलिच्छ राजकारण केले आहे. जनतेने तुमच्या हातात सत्ता दिली, पण तुम्ही सत्तेचा गैरवापर करून हत्या, खंडणी असे प्रकार केले. दोन्ही भाऊ-बहिणींनी राजकारणातून एक्झिट घ्यावी. तुमच्या एक्झिटची मोठी सभा परळीत मी स्वतःच्या खर्चाने घेते. मी एक्झिटसाठी तुम्हाला पाठिंबा देते. तुमच्या जागेवर मी काम करून दाखवते, तुम्ही मला पाठिंबा द्या.”

अवश्य वाचा : परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; पेपरफुटी प्रकरणातील दोषींना ३ महिन्यांच्या आत होणार शिक्षा

‘२०२९ साली मी निवडणुकीला उभी राहून निवडून येईन’ (Karuna Sharma on Pankaja Munde)

पुढे त्या म्हणाल्या, “तुमच्या जागेवर कसे काम करावे लागते, हे मी तुम्हाला करून दाखवते. २०२९ साली मी निवडणुकीला उभी राहून निवडून येईन. मी तुम्हाला पाच वर्षांत दाखवणार की, लोकांसाठी काय करावे लागते, लोकांची काय गरज आहे?,” असे म्हणत करुणा शर्मा यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.