Dr. Meera Dhas : शिर्डी : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (Directorate General of Information and Public Relations) अधिपत्याखालील उप माहिती कार्यालय, शिर्डी (Shirdi) येथे प्रशासकीय बदलीने नियुक्त झालेल्या डॉ. मीरा ढास (Dr. Meera Dhas) यांनी आज माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
पुणे, नांदेड, छत्रपती संभाजी नगर येथील अनुभव
डॉ. ढास या जुलै २००८ मध्ये शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात उपसंपादक म्हणून मंत्रालय, मुंबई येथे रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सहाय्यक संचालक म्हणून कार्य केले. पुढे जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तेथून प्रशासकीय बदलीने त्यांची उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गाडीलकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला (Dr. Meera Dhas)
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. मीरा ढास यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. मीरा ढास यांनी सांगितले की प्रभावी संवाद कौशल्याच्या आणि विविध समाज माध्यमातून शासनाच्या जन कल्याणकारी योजना व विविध उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिर्डी हे ठिकाण श्री साईबाबा यांच्या पावन भूमीमुळे प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात.साई भक्तांसाठी, आणि नागरिकांसाठी शासन विविध स्तरावरून सुविधा उपलब्ध करुन देत आहे. या उपक्रमाला लोकांसमोर सकारात्मक पद्धतीने आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथील कर्मचारी श्री. मंगेश रसाळी व श्री. अभिजीत मुठे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. मीरा ढास यांचे स्वागत केले तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



