Balasaheb Nahata Arrest : श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा (Balasaheb Nahata) यांना फसवणुकीच्या एका जुन्या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी (Srigonda Police) अटक केली असून पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) जारी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा : संगमनेर मार्गे रेल्वे आणण्यासाठी शेवटपर्यंत लढणार : आमदार खताळ
११ जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न
मिळालेल्या माहितीनुसार वाकड येथील सॉफ्टवेअर अभियंता राहुल रामराजे मक्तेदार (वय ४३) यांची तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात बाळासाहेब नाहाटा यांच्यासह अजय चौधरी आणि रविराज जोशी यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले होते. तपासादरम्यान नाहाटा यांनी ११ जणांची तब्बल ९ कोटी ४९ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नाहाटा यांना केले पुणे पोलिसांच्या स्वाधीन (Balasaheb Nahata Arrest)
या प्रकरणात पोलिसांनी याआधीच अजय चौधरी आणि रविराज जोशी यांना अटक केली होती. त्यानंतर चौधरी यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, बाळासाहेब नाहाटा हे सातत्याने हुलकावणी देत होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. नाहाटा हे श्रीगोंदा शहरात आल्याची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने राजकीय वर्तुळात आणि बाजार समिती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.



