
Balrangbhumi Parishad : अहिल्यानगर : बालरंगभूमी परिषदेतर्फे (Balrangbhumi Parishad) दरवर्षी अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के- सामंत (Adv. Neelam Shirke-Samant) यांच्या संकल्पनेतून ‘इतिहास महाराष्ट्राचा’ (History of Maharashtra) हा महोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी इतिहासातील एका थोर विभूतीला हा महोत्सव समर्पित असतो. ह्यावर्षी ह्या महोत्सवाचा विषय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा असून त्याची अंतिम फेरी घेण्याचा मान अहिल्यानगर शाखेला मिळाला आहे.
४०० बालगोपाल सहभागी होणार
बालरंगभूमी परिषदेच्या सर्व शाखांमध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी २ ऑगस्ट रोजी झाली असून सदर महोत्सव दिनांक ९ ऑगस्ट रोजी माऊली सभागृहात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या महोत्सवासाठी जवळपास ४०० बालगोपाल यात सहभागी होणार आहेत.या स्पर्धेमध्ये एकल छोटा गट, मोठा गट आणि सांघिक गटामध्ये विद्यार्थी अहिल्याबाई होळकरांचे जीवनकार्य नाट्यछटा, गाणी, नाट्यरूपांतर अशा विविध प्रकारात सादर करणार आहेत. नगरवासीयांसाठी ही स्पर्धा एक मोठी सांस्कृतिक पर्वणी असेल ह्यात शंका नाही असे मत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष्य प्रसाद भणगे यांनी व्यक्त केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नगरकर रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन (Balrangbhumi Parishad)
या महोत्सवाची अहिल्यानगर शाखेची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. यात एकल गट क्र.१ मध्ये ध्वज विराज मुनोत, तर एकल गट क्र. २ मध्ये अद्वैती श्रीकृष्ण लुटे यांनी तर सांघिक गटामध्ये पी. एम. श्री. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय छावणी परिषद शाळा यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. इतिहास महाराष्ट्राचा नगर शाखेचा प्राथमिक फेरीचा बक्षीस वितरण समारंभ सिने अभिनेते हरिष बारस्कर तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक अभिजित दळवी यांच्या हस्ते, बहुउद्देशीय सभागृह, पेमराज सारडा महाविद्यालय येथे करण्यात आला. या प्रसंगी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती चे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, देवीप्रसाद सोहोनी तसेच अहिल्यानगर शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तरी सर्व नगरकर रसिकांनी या महोत्सवात सहभागी होत राज्यभरातील बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.


